महागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल…..
महागाव पोलिसांनी ६ हातभट्या केल्या उध्वस्त ; लाखोंचा सडवा नष्ट ; ७ जणांवर गुन्हा दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :-
तालुक्यातील सवना व कलगाव येथे महागाव पोलिसांनी अवैध हातभट्या उध्वस्त केल्या आहेत.अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळी लाखोंचा सडवा नष्ट करण्यात आला आहे.ही कार्यवाही महागाव पोलिसांनी आज ( ता.३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास केली आहे.
महागाव तालुक्यातील सवना व कलगाव येथे अवैध हातभट्टी माध्यमातून दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांना मिळाली.त्यानुसार त्यांनी कलगाव व सवना येथे आपल्या ताफ्यासह अवैध दारू विक्री करणारे सराईत गुन्हेगार यांच्या घरावर धाड टाकली.या धाडीत १४४० लिटर दारूचा सडवा,देशी पव्वे, असा एकूण अंदाजे १ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर घटनास्थळी लाखोंचे निकामी साहित्य नष्ट करण्यात आला आहे.
संशयित आरोपी
नागोराव धोत्रे,संतोष मिरे,शांताराम पवार,गंगुबाई मारोती यातेवाड,साहेबराव पवार,दत्ता धोत्रे,सर्व रा. सवना साधना काले रा. कलगाव
यांच्यावर कलम ६६ (ई),(फ),दारूबंदी कायदा कलम १८८,२६९,२७० भादवी सहकलम ३,४ साथरोग नियंत्रण अधिनियम व प्रचलित कायदे व नियमानुसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे ,पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण पवार ,विलास राठोड, दिनेश आडे संतोष जाधव, प्रमोद पवार ,अर्जुन राठोड,अश्विनी उघडे,यांनी केली आहे.