अवघड क्षेत्र घोषित करताना माहूर किनवट तालुक्यावर प्रचंड अन्याय…
अवघड क्षेत्र घोषित करताना माहूर किनवट तालुक्यावर प्रचंड अन्याय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी महाराष्ट्र शासनाने 7/04/2021 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार माहूर किनवट तालुक्यातील अनेक गावे अवघड क्षेत्र म्हणून घोषित होण्यासाठीचे किमान 7 पैकी 3 निकष पूर्ण करीत असताना सुद्धा प्रशासनाने माहूर किनवट या आदिवासी बहुल भागात डोंगरी भागातील शाळांवर प्रचंड अन्याय केला असून या भागात नोकरीं करणाऱ्या व यावर्षी तरी बदली होईल या आशेने अवघड क्षेत्र घोषित झाल्यावर या सर्वांच्या स्वप्नावर पाणी फेरले असून हे सर्व शिक्षक लोकप्रतिनिधी कडे व न्यायालयात त्वरित दाद मागणार आहेत. या शिक्षकांच्या मनामध्ये अवघड क्षेत्र समितीच्या अन्यायकारक वर्तनाने प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.
अवघड झालेल्या जिल्हा यादीत माहूर 13, किनवट 32, हदगांव 2 व मुखेड मधील 1गावांचा समावेश आहे.
अवघड क्षेत्र घोषित होण्यासाठी 7 निकष ठरविण्यात आले असून त्यामधील माहूर किनवट मधील बहुसंख्य गावे पेसा नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतात, हिंश्र प्राण्यांचा वावर माहूर तालुक्यात जवळपास 92 गावात असल्यांचे लेखी पत्र रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर माहूर यांनी दिले आहे,नुकतेच म.पार्डी येथे दोन बिबटे म्रुत झाल्याने व फेब्रूवारी 2021मधे आष्टा येथील एका 27 वर्षीय शेतक-याचा अस्वलाने पाठलाग केल्याने या गोष्टीला पूष्टी मिळाली. डोंगरी क्षेत्र म्हणून माहूर आणि किनवट हे दोन्हीही तालुके शासनाने घोषित केले आहे. बरीच गावे ही राज्य राष्ट्रीय महामार्गपासून, सार्वजनिक वाहतूक नसलेली गावे आहेत. माहूर किनवटचे सरासरी प्रजन्यमान सुद्धा 2000 mm च्या वर आहे. या सर्व बाबींचा विचार करता फक्त 3 निकष पूर्ण करण्याची आवश्यकता असताना अनेक गावे, 4,5 निकष पूर्ण करीत असताना सुद्धा माहूर मधील केवळ बोटावर मोजण्या इतकी गावे अवघड क्षेत्र घोषित करून माहूर -किनवट मध्ये खितपत पडलेल्या गरीब व राजकीय पाठबळ नसलेल्या शिक्षकांवार प्रचंड अन्याय केला असून यादी वर आक्षेप घेतल्यावर तरी अन्याय दूर करावा अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहेत.
इतर तालुक्यावरही अन्यायच :-
2018 च्या बदल्यामध्ये जिल्हात 214 गावे अवघड होती काही शिक्षक 3 वर्षात परत आपल्या भागामध्ये 3 वर्ष नोकरीं करून परत येता येते म्हणून अशा अवघड क्षेत्रात गेले परंतु ती गावे आता सर्वसाधारण क्षेत्रात येत असल्याने त्या शाळेत तीन वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांवरही प्रचंड अन्याय होत आहे.
जिल्हा संघटनाची भूमिका संधिग्द :-
जिल्हात अनेक शिक्षक संघटना कार्यरत आहेत. अवघड क्षेत्रा संधर्भात बऱ्याच शिक्षक संघटनाची भूमिका संधिग्ध आहे.
अवघड क्षेत्रात जास्त शाळा निघाल्या तर अनेक शिक्षकांना किनवट माहूर मध्ये जावे लागेल म्हणून काही शिक्षक नाराज होतील म्हणून संघटनानी “सबसे भला चूप ” या न्यायाने अवघड क्षेत्रातील शिक्षकांकडे काही संघटनानी कानाडोळा केला आहे. ज्या संघटना कोणतीच भूमिका घेत नाहीत त्या तालुक्यातील अध्यक्ष यांनी आपल्या जिल्हाध्यक्षांकडे किनवट माहूर वर झालेल्या अन्यायची माहिती देऊन आपली भूमिका काय? ते सांगण्यास बाध्य करावे अशी मागणी शिक्षकांतून होत आहे. यादी वर आक्षेप घेतल्यावर यादीत सुधारणा होते कि, न्यायालयाची पायरी चढावी लागते या कडे सर्व शिक्षकांचे डोळे लागले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..