मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवा ; दररोज शेकडो महिलांना एकत्र करून नियमाची पायमल्ली….!
मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवा ; दररोज शेकडो महिलांना एकत्र करून नियमाची पायमल्ली….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन लावले असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून शेकडो महिलांना एकत्र करून या कंपन्या कर्ज वसुली करत असल्याने या कंपन्यांची वसुली काही काळापुरती थांबविण्याची मागणी मनसे चे गजानन कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते विनोद सुर्यवंशी यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार
रोखण्यासाठी लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश असतानाही
मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी दर दिवसाला विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी माहूर,वाई बाजार,वानोळा परिसरात हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार होऊन विषाणू संसर्गबाधित रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांद्वारे कामगारांना तसेच महिला बचत गट सदस्यांच्य़ा अशिक्षितपणाचा फायदा घेऊन खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आमिष दाखवून कर्ज वितरण केले आहे; मात्र, ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर या महिलांमध्ये कर्ज हप्त भरण्याइतकी आर्थिक कुवत राहिलेली नाही. या कामगारांना व महिलांच्या हाताला काम नसल्याने वेतन मिळत नाही, अशा परिस्थितीत खासगी तसेच मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते ते भरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी तालुक्यातील महिला बचत गटांना तसेच अन्य नागरिकांना हप्ता भरण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचा आरोप गजानन कुलकर्णी व विनोद सुर्यवंशी यांनी केला आहे. महिला बचत गट व खासगी व्यावसायिकांची या जाचातून काही काळासाठी सुटका करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….