मांडवी परिसरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री..! ग्राहकांची लूट , प्रशासनाचे दुर्लक्ष…
मांडवी परिसरात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री..!
ग्राहकांची लूट , प्रशासनाचे दुर्लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
किनवट (मांडवी) :-
देशावर कोरोनाचे महासंकट आल्याने सरकारी यंत्रणा हे संकट दुर करण्यासाठी जिवाची पर्वा न करता संकटाची दोन हात करीत आहे. याउलट मांडवी व परिसरातील किराणा व्यापारी या संकटाला संधी समजून किराणा मालाचे आव्वाच्या सव्वा भावात विक्री करून चांदी करीत आहे.कोरोनाचे संकटाने भेदरलेल्या नागरिकांची संकटातही लुट करीत असल्याने मुडद्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे जागरूक नागरीक बोलत आहेत.
राज्यात कोरोणाचे महासंकट घोंगावत आहे. या महासंकटाशी दोन हात करण्यासाठी सरकार खंबीरपणे रस्त्यावर उतरले आहे.राज्यभर संचारबंदी लागु केलेली आहे.त्यामुळे नागरिक घरात बसूनच कोरोनाला परतून लावण्यासाठी गनिमी काव्याची लढाई करीत आहे.
कोरोणापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी महसुल व पोलिस प्रशासन रात्रंदिवस रस्त्यावर उतरून गर्दी पांगवण्यासाठी जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करीत आहेत.तर डॉ व आरोग्य कर्मचारी जिवाची पर्वा न करता रूग्णाची सेवा करीत आहेत.या संकटाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणा जिवाचे रान करीत आसले तरी मांडवी व परिसरातील किराणा व्यवसायिक या संकटाला संधी समजून उखळ पांढरे करून घेत आहेत.सामान्य नागरिकांची लूट करीत आहेत.दाळी,साखर,शेंगदाने,तेल,व इतर साहित्य अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून जास्तीचा नफा कमावत आहेत.
दर वाढीबाबत नागरिकांनी विचारणा केली असता शॉर्टेज आहे.भावाबाबत घासघिस करणाऱ्या ग्राहकांना तर मागितलेला मालच शिल्लक नसल्याचे सांगून बोळवन केली जाते.छोट्या ग्राहकांना तर मालाचे बिलही दिले जात नाही.त्यामुळे किराणा माल विक्रेत्याकडून ग्राहकांना तोंड दाबुन बुक्याचा मार सुरू आहे.
शासकीय यंत्रणेने रास्त भावात किराणा माल विकण्याचे आवाहन अनेकदा केलेले आहे.मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत देशावरील संकटाला सधी समजून स्वतःची चादी करण्याचा सपाटा या परिसरातील व्यवसायिकानी सुरूच ठेवला आहे.तरी प्रशासानाने या प्रकाराला आळा घालून नागरिकांची लुट थांबवावी,आशी मागणी होत आहे.