श्रीराम जन्मोत्सवाच्या पर्वावर पाच बेडच्या कोवीड सेंटर उभारणार ; तुपटाकळी ग्रामस्थांच्या अभिनव उपक्रम….


श्रीराम जन्मोत्सवाच्या पर्वावर पाच बेडच्या कोवीड सेंटर उभारणार ; तुपटाकळी ग्रामस्थांच्या अभिनव उपक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- (पुरुषोत्तम कुडवे 9822887065)
मागील वर्षीपासून कोरोना महामारी थैमान घातले.असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना बाधित रुग्ण वाढतच चालल्याने व शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे बेड उपलब्ध नसल्यामुळे गरजवंत रुग्णांना उपचारा अभावी आपला जीवही गमवावा लागत असल्यामुळे या संपूर्ण गंभीर बाबीचा विचार लक्षात घेऊन दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील श्रीराम मंदिर संचालकाच्या सदस्यांनी गेल्या गेल्यावर्षीची तसेच याहीवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या हर्ष उत्सवाने साजरा होणारा कोरोनाव्हायरस च्या थैमानाने जल्लोषात साजरा न करता सोशल डिस्टंसिंग चे नियम पळून अवघ्या दोन-तीन लोकांमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करून श्रीराम जन्म उत्सवाच्या उत्सवादरम्यान मंदिराच्या संस्थांच्या संचालकांनी तुपटाकळी येथील गावकऱ्यांच्या सोयीकरिता संस्थाने मंदिरा व्यतिरिक्त केलेल्या बांधकामामध्ये तुपटाकळी येथील नागरिकांसाठी कोवीड सेंटर उभारून फक्त तूपटाकळी या गावातील कोणत्याही नागरिकास कोरोना ची लागण झाल्यास त्याचा उपचार पूर्णपणे मोफत होण्याकरिता सुविधा व्हावी. म्हणून यादरम्यान मंदिरामध्ये घोषणा करण्यात येऊन ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याकरिता संचालक मंडळ तयारीला लागले आहे.
तालुका प्रशासन खंबीरपणे रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या विभागांमध्ये नागरिकांचे तपासणी करून कोरोना सारख्या महा मारीला न घाबरता या व्हायरस सोबत सक्षमतेने लढून कोरोना हद्दपार करण्याची तयारी चाललेली असताना, नागरिकांमधील भीतीचे वातावरण अद्यापही संपूर्ण संपुष्टात येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमता वाढवून असल्याने तपासणीदरम्यान जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास आपल्याला आपल्या परिवारास सोडून जिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतील मृत्यू नंतरही परिवाराला आपला मृतदेह सुद्धा मिळत नसल्याची भीती ही प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये असल्याचे विदारक वास्तव लक्षात घेता 5 बेडचे यामध्ये चार बेड ऑक्सिजनचे व एक बॅड पूर्णतः व्हेंटिलेशन सह सुविधा गावकऱ्यांना मोफत पुरविण्याचा संकल्प केल्याची घोषणा श्रीराम संस्थान चे अध्यक्ष श्रीराम ठाकरे तसेच सचिव दीपक आनंदवार अविनाश ठाकरे नंदकिशोर कंडलोया तसेच भगवंत ठाकरे यांनी करून फक्त तुपटाकळी येथीलच नागरिकांसाठी सुवीधा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”