वाई बाजारात अर्धे शटर उघडून व्यवसाय जोमात ; संचारबंदीच्या नियमाचे भिजत घोंगडे कायम ; कापड दुकानांचे शटर बंद, आतून विक्री,६० चा पव्वा १२० रु दराने विक्री….
वाई बाजारात अर्धे शटर उघडून व्यवसाय जोमात ; संचारबंदीच्या नियमाचे भिजत घोंगडे कायम ; कापड दुकानांचे शटर बंद, आतून विक्री,६० चा पव्वा १२० रु दराने विक्री….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :-
माहुर तालुक्यातील वाई बाजार गावात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे. असे असताना गावातील काही व्यावसायीक अर्धे शटर उघडे ठेऊन आपला व्यवसाय करत आहे.
सद्या सर्वत्र कोरोना बाधीतांची संख्या मोठ्याप्रमाणात आढळुन येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चैन’ मध्ये बदल करुण दि.२० एप्रील पासून अत्यावश्यक अस्थापणाला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश पारीत केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ५ एप्रिल पासून संचारबंदी घोषित करण्यात आली होती. परंतु या लॉकडाऊन मध्ये तालुक्यातील वाई बाजार येथील कापड दुकान व इतर दुकानांचे अर्धे शटर वर तर काही दुकानात बाहेरुन शटर बंद करुण आत व्यापार सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तरी पोलिस प्रशासनाने व संबधीत अधिकार्यांने कापड दुकानात लावलेले सी.सी टी.व्ही तपासून पाहिल्यास दुध का दुध पाणी का पाणी होईल हे माञ तेवढेच सत्य आहे.
या लॉकडाऊन मध्ये मद्याचे सर्व दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची चांगलीच फजिती होतांना दिसुन येत आहे.दारु दुकाने बंद असुनही तळीराम बंद दारु दुकानासमोर उभे राहुन दुकान उघडण्याची वाट पाहत आहे. याचाच गैरफायदा घेऊन येथील बिअर शाॅफी मालकानी ६० रुपयाचा देशी दारुचा पव्वा चक्क १२० रुपयाला विक्री करत असल्याची माहिती तळीरामांकडून मिळत आहे.तसेच देशी दारुचा पव्वा १२० रुपये दराने विक्री करतो असे संभाषण झालेली अॅडीओ क्लिप शोसलमिडीयावर फिरत आहे.या तळीरांमाचे असेही म्हणने आहे की, यांना दारुचे व्यसन जडल्याने दारु शिवाय जेवन आणी झोप सुध्दा येत नाही.परिणामी ६० रुपयाचा देशी पव्वा १२० रुपयात घ्यावा लागत आहे. असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे.