महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीच्या राज्य समन्वयक पदी डॉ.निरंजन केशवे यांची नियुक्ती
राजकिरण देशमुख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर –
समाजातील गरजू घटकांना वैद्यकीय सहाय्यता विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्याच्या मानवतावादी दृष्टीकोनातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ई महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने माहूर तालुक्यातील कॉंग्रेसचे धडाडीचे युवा कार्यकर्ते डॉ. निरंजन केशवे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जनसेवेची धडपड पाहून व आजवर गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीच्या काळात माहूर तालुक्यात दिलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांना जनसेवेचे हे कार्य अधिक व्यापकरित्या करण्याकरिता संधी उपलब्ध करून देत वैद्यकीय सहाय्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदावर नुकतीच नियुक्ती देण्यात आली आहे.

डॉ. निरंजन केशवे हे गेल्या पाच वर्षांपासून माहूर तालुक्यातील जनतेची आरोग्य सेवा करीत असून वडीलोपार्जीत राजकीय वारसा लाभलेले असल्याने वैद्यकीय सेवेबरोबरच तालुक्यातील अनेक नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून अल्पवधीतच एक लोकप्रिय युवा नेते म्हणून उदयास आले आहेत. हीच बाब हेरून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु, भारतीय राष्ट्रीय युवक कॉंग्रेस अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश यूवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्या सुचनेवरून महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चिटणीस तथा वैद्यकीय सहाय्यता विभागाच्या मुख्य समन्वयक वैष्णवी किराड यांनी नुकतेच डॉ. निरंजन केशवे यांना राज्य समन्वयक पदी नियुक्तीचे पत्र देऊन राज्यभर व्यापक रीतीने कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
नियुक्तीबद्दल डॉ. केशवे यांचे माजी मंत्री डी.पि. सावंत, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, आ. अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, माहूर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष जि.प. सदस्य संजय राठोड. दिलीप मुनगिलवार, मंचकराव देशमुख, कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, मुनाफभाई, फिरोजखान, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन बेहेरे,राजकिरण देशमुख,निसार कूरेशी, विध्यार्थी काँग्रेस चे अझीम सय्यद, सलमान काझी,करीमशहा तय्यब शहा, माहूर न.प.च्या उपाध्यक्षा सौ,अश्विनीताई आनंद पाटील तुपदाळे,तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने,सोनू राठोड, आदीसह जिल्हाभरातून डॉ.निरंजन केशवे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…