पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा….
पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 19 :- राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता यवतमाळ येथे आगमन. दुपारी 1.30 ते 2 वाजता आमदार संजय राठोड यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 2 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 ते 4.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, येथे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व कोरोना संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी यांच्या समवेत कोविड – 19 अनुषंगाने सविस्तर आढावा बैठक. सायंकाळी 4.30 ते 5 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट व पाहणी. सायं. 5 ते 5.15 वाजता कोविड केअर सेंटर, यवतमाळ भेट व पाहणी. सायं. 5.15 ते 5.30 वाजता कोविड लसीकरण केंद्रास भेट. सायं. 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथून ता. नेर कडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता नेर येथे आगमन मनरेगा कामास भेट व पहाणी. सकाळी 9.15वाजता नेर येथून जानोरी ता. कारंजा, जिल्हा वाशिमकडे प्रयाण.
०००००००