वैष्णव विद्यापीठाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार अभिजित फाळके यांना जाहीर….
वैष्णव विद्यापीठाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार अभिजित फाळके यांना जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
वैष्णव विद्यापीठ इंदौरच्या वतीने फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील मानाचा बेस्ट वॉक मेल पुरस्कार अभिजित फाळके यांना जाहीर करण्यात आला.
इंदौर येथील वैष्णव विद्यापीठाच्या विश्वविद्यालय टेक्सटाईल टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने ऑनलाइन फॅशन शो२०२१चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये देशभरातील फॅशन डिझायनिंग करणारे विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये महाराष्ट्र राज्यातुन यवतमाळ जिल्ह्याचा अभिजित फाळके हा एकमेव विद्यार्थी सहभागी झाला होता.त्याने यामध्ये ट्रॅडिशनल अँड वेस्टर्न थीम रॅम्प वॉक मध्ये आपल्या कौशल्याची चुणुक दाखवुन परिक्षकांचे मन जिंकुन घेवुन या फॅशन शो मध्ये अव्वल क्रमांक पटकावला असुन त्याला बेस्ट वॉक मेल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील पत्रकार भगवानराव फाळके यांचा अभिजित मुलगा असुन दहावी नंतर अभिजित ने फॅशन डिझायनर क्षेत्रात करियर करायचे असा ठाम निर्णय घेवुन त्याने पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधुन फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे.सद्या तो गुजरात मधील अंकलेश्वर येथील एफडीडीआय कॉलेज मध्ये डिझायनर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अभिजित ने पटकावलेल्या नेत्रदिपक यशाचे सर्वत्र कौतुक होत असुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.