मनविसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड….
मनविसेच्या तालुका उपाध्यक्ष पदी अमर चव्हाण , विभागाध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महागाव तालुकाउपाध्यक्षपदी अमर चव्हाण तर गुंज विभाग अध्यक्षपदी सुनिल आव्हाड यांची निवड करण्यात आली.
मराठी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कार्यरत असुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मनविसे राज्यात अग्रेसर असणारी विद्यार्थी संघटना आहे. महागाव तालुक्यात विद्यार्थ्यांचे संघटन मजबुत करण्यासाठी मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर ,आनंद यंबडवार यांच्या आदेशाने व मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाउपाध्यक्ष पदी अमर चव्हाण यांची तर गुंज विभाग अध्यक्ष पदी सुनिल आव्हाड यांची निवड मनविसे महागाव तालुकाध्यक्ष महेश कामारकर यांनी केली यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण ,मनसे तालुकाउपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे तालुका सचिव शेख राहील यांच्या हस्ते अमर चव्हाण व सुनिल आव्हाड यांनी नियुक्ती पत्र देण्यात आहे.यावेळी योगेश तळणकर,अमर अंभोरे,सुरेश आव्हाड,पृथ्वीराज राठोड,अंगद कदम, रवी शिंदे,प्रेमजीत जाधव,आदित्य अंभोरे,ओंकार काळे, शेख सोहेल,गणेश सुरोशे,शेख बिलाल, ऋषीकेश बोरगडे ,सुशील खंदारे, शेख सलिम योगेश भालेराव,ओंकार चव्हाण,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.