राहुरी येथील पत्रकार हत्या प्रकरणाचा निषेध ; दिग्रस तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना पत्रकारांचे निवेदन…

राहुरी येथील पत्रकार हत्या प्रकरणाचा निषेध ; दिग्रस तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना पत्रकारांचे निवेदन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करुन हत्या झाली, या घटणेचा निषेध व कारवाई ची मागणी शुक्रवार,९ एप्रिलला दिग्रस तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.
पत्रकारांवर हल्ल्याचे प्रकरण वाढत आहेत, याची दखल प्रशासनाने घेणे आवश्यक झाले आहे.यातील राहूरी येथील पत्रकार दातीर यांची हत्या प्रकरण आहे, प्रकरणातील दोषींवर कडक शासन व्हावे, पत्रकार दातीर परिवारास शासकीय मदत देण्याची मागणी दिग्रसच्या पत्रकारांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी पत्रकार सुरेश चिरडे , संजय शुक्ला, पि.पि.पप्पुवाले, सुनिल हिरास, अभय इंगळे, अफजल खान, धर्मराज गायकवाड, रफिक खान किशोर कांबळे, अयाज काजी, जुबेर खान, रुषीकेश हिरास यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….