शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याची मागणीची शासनाने घेतली दखल….
शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याची मागणीची शासनाने घेतली दखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना संघटनेच्यावतीने राज्य उपाध्यक्ष जी .एस. मंगनाळे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले व त्यावर चर्चा करून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या जिल्हास्तरावर झाल्या पाहिजे अशी मागणी व त्याची गरज विशद केली. जिल्हाधिकारी साहेबांनी मागणीची दखल घेऊन शासनाला संघटनेच्या भावना कळविण्यात आल्याने शासनाने ऑनलाइन बदल्या देण्याचे नुकतेच एक परिपत्रक काढल्याबद्दल संघटनेच्या प्रयत्नाबद्दल शिक्षक बांधव समाधान व्यक्त करीत आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा माहूर तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील ,सरचिटणीस मनोज बारसागडे, मिलिंद कंधारे, सुधीर जाधव आदींनी दिली आहे.