लॉकडाऊन मध्ये तीन दिवसाच्या आत शिथिलता द्या ; अन्यथा दिग्रस दारव्हा नेर येथे मोर्चा काढु :- माजी राज्यमंत्री संजय देशमुख…

लॉकडाऊन मध्ये तीन दिवसाच्या आत शिथिलता द्या ; अन्यथा दिग्रस दारव्हा नेर येथे मोर्चा काढु :- माजी राज्यमंत्री संजय देशमुख…
पुरुषोत्तम कुडवे 9822887065
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :-
मागील एक वर्षापासून महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर तालुक्यात सुद्धा कोरणा-या महामारी ने थैमान घातले.असून त्यामध्ये लहान मोठे व्यापारी यांच्या व्यापारावर परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारी च्या काळामध्ये व्यवसायीकांना सुट द्या, अन्यथा दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील व्यापाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा बुधवार, ७ एप्रिलला सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाला जाऊन निवेदन दिले आहे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्य़ात जमावबंदी व संचारबंदीचे नवीन अध्यादेश काढण्यात आले परंतू बारा बलुतेदार व्यावसायीक, हातावर काम करणारे कारागीर, रोजमजुर व छोटे-मोठे व्यापारी यांना सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुट देण्यात यावी .अन्यथा जिल्हाधिरी कार्यालयावर व्यापाऱ्याना सोबत घेऊन संजय देशमुख मित्र मंडळ ,व्यापारी व रोज मजूर वर्ग यांच्या माध्यमातून मोर्चा काढणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
माजी मंत्री संजय देशमुख यांच्यासह किराणा दुकान संघटणेचे अध्यक्ष यतीन गड्डा, सचिव शरद पद्मावार, विवेक बनगीनवार,विशाल सत्तूरवार, दीपक वानखडे, फारुक नागाणी यांनी तहसीलदार राजेश वजीरे यांना निवेदन देताना उपस्थित होते .

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….