फुलसावंगी गावाच्या प्रास्ताविक सिमा सिल तर संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित ; एसडीओंचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील फुलसावंगी गावात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फुलसावंगी गावाच्या प्रास्ताविक सिमा बंद तर संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. महसूल अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी सदर आदेश परीत केले आहे.
फुलसावंगी गावाची लोकसंख्या १४७३० असून एकूण २० कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.तर त्यालगत एकूण १३ कुटुंब कोरोना बाधित असल्याने कोरो नाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे.त्यामुळे संपूर्ण फुलसावंगी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेली फुलसावंगीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद ठेवावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवा मध्ये रुग्णालये, औषधी दुकाने तसेच पशुवैद्यकिय रुग्णालये व त्यांचे औषधी दुकाने हे २४ x ७ सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.तसेच किराणा दुकान, भाजीपाला, दुध विक्री, फळांची दुकाने, व पशु खाद्य दुकाने हे सकाळी ९ ते सकाळी १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.तर रात्रीला ७ ते ८ वाजेपर्यंत एक तास दुध खरेदी / विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. सदर आदेश ७ एप्रिल रात्री १२ वाजेपासून ते दिनांक १३ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.