रेणुका देवी गडावर वणव्यामुळे भीषण अग्नितांडव… प्रसंगावधान राखल्याने रेणूकादेवी मंदिर संस्थान व 125 व्यापारी प्रतिष्ठाने थोडक्यात बचावली…
रेणुका देवी गडावर वणव्यामुळे भीषण अग्नितांडव…
प्रसंगावधान राखल्याने रेणूकादेवी मंदिर संस्थान व 125 व्यापारी प्रतिष्ठाने थोडक्यात बचावली…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
(राजकिरण देशमुख)
माहूर :- महाराष्ट्र राज्य सह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील रेणुका देवी संस्थान च्या सभोवतालच्या जंगलांमध्ये वनवा पेटल्यामुळे काही वेळातच अग्नीने रुद्र रूप धारण करून संपूर्ण मंदिर परिसराला वेढा घातला होता.रेणुका गडावरील व्यापारी मंडळीने प्रसंगावधान राखून अग्निशमन दल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यामुळे शर्थीचे प्रयत्न केले गेले व अवघ्या काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.(ता.६) एप्रिल च्या रात्री आठ वाजताच्या सुमारास गडावर लागलेल्या आगीचे ज्वाला इतक्या प्रचंड होत्या की,काही वेळ ही आग अशीच धगधगत राहिली असती तर श्री.रेणुका देवी मंदिर संस्थांनसह संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने आगीत जळून खाक झाली असती.
माहूर जिल्हा नांदेड येथील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या श्री.रेणुकादेवी संस्थानाच्या परिसरातील जंगलात काल रात्री आठ वाजताच्या सुमारास लागलेल्या वणव्यामुळे श्री रेणुका देवी मंदिर पलीकडच्या दत्तशिखर अरण्या कडून लगतच्या श्री.परशुराम मंदिर व रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी वनवा पेटला,आगीचे ज्वाळा इतक्या भीषण मोठ्या होत्या की आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले मात्र गडावरील व्यापारी मंडळी,वनविभागाचे कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून प्रयत्नाची पराकाष्टा करत वेळेत पोहोचून अथक प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविल्याने माहूर वनपरिक्षेत्र च्या धनदाट जंगलामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात सातत्याने वणवा पेटत असतो.मागील काही दिवसाखाली न्यायालय परिसरात दोन वेळेस वनवा पेटला होता त्याही वेळेस अग्निशमन दलाने आपली कामगिरी दाखवली.लॉक डाउन व संचार बंदी मुळे रेणुकादेवी गडावरील दुकाने बंद असल्याने व्यापारी घटनास्थळावर हजर नव्हते परंतु घटनेची माहिती समजताच सर्व व्यापाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आपत्कालीन यंत्रणेला अवगत करून ही आग विझवली.दरम्यान सन 1995 मध्ये अशा स्वरूपाचा अग्नितांडव रेणुका देवी मंदिर गडासह परिसरात पाहायला मिळाला होता.या घटनेची आठवण करत प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितल्याप्रमाणे क्षणाचाही विलंब झाला असता तर महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ श्री.रेणुका देवी मंदिर व संस्थांनासह 125 व्यापारी प्रतिष्ठाने या आगीत जळून खाक झाली असती.माहूरगडावरील रात्री घडलेल्या या घटनेमध्ये वनविभागाचे कर्मचारी नगरपंचायत चे अग्निशमन दल यांनी दाखविलेल्या कार्यतत्पर ते मुळे प्राणहानी व मोठी वित्तहानी टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.