युवकांनो नवनिर्माणाच्या प्रवाहात सामील व्हा :- मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांचे आवाहन… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त पाठींबा…

युवकांनो नवनिर्माणाच्या प्रवाहात सामील व्हा :- मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांचे आवाहन…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त पाठींबा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे व विरोधी पक्षाच्या काम चलाऊपणामुळे राज्यातील युवकांच्या अपेक्षाचा भंग झाला असुन युवकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मनसे सदैव कटिबद्ध असल्याने युवकांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी मनसेत सामील व्हावे असे आवाहन मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबीत असुन यामध्ये शेतकरी,युवक,महिला विद्यार्थी यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.युवकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असुन या सर्वांवर फक्त मनसेच जनतेला न्याय मिळवुन देण्याचे कार्य करीत आहे त्यामुळे आज राज्यातील युवा वर्ग मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन मनसेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्राचे नवनिर्माण करावयाचे असल्यास महागाव तालुक्यातील युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माणाच्या प्रवाहात सामील व्हावे असे आवाहन मनसेचे महागाव तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी केले.
महागाव तालुक्यातील गुंज येथुन मनसेच्या सदस्य नोंदणी अभियान२०२१-२०२३ चा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुंज परिसरातील शेकडो युवकांनी मनसेे सदस्य नोंदणी करून मनसेत प्रवेश घेतला . यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनसे तालुका उपाध्यक्ष राहुल जयस्वाल, मनविसे तालुका सचिव शेख राहील यांनी मनसेत प्रवेश घेणाऱ्या या सर्व युवकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सुनिल बोक्से,योगेश तळणकर, अमर अंभोरे, पृथ्वीराज राठोड सुरेश आव्हाड,नितीन पवार,अमर चव्हाण,अंगद कदम, प्रेमजीत जाधव, ओंकार चव्हाण, गणेश शिंदे,आदित्य अंभोरे,योगेश भालेराव, शेख बिलाल, गणेेेश सुरोशे सोहेल शेख, ऋषिकेश बोरगडे, सुशिल खंदारे, शेख सलीम यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येनेेे उपस्थित होते

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..