राज्यात दोन दिवसांचा लॉकडाउन ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..
राज्यात दोन दिवसांचा लॉकडाउन ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
मुंबई :- राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विकेंड लॉकडाऊचा निर्णय घेण्यात आला असून शनिवार रविवार लॉकडाउन होणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
या दरम्यान बार हॉटेल मॉल बंद राहणार. तसेच भाजी मंडई देखील बंद राहणार अस नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
जनतेने नियमांचे पालन करावे अस आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. लॉकडाउन बाबत सर्व राजकीय पक्षांशी बोलून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले.