जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त ; 6 मृत्युसह 471 जण पॉजिटिव्ह…
जिल्ह्यात 611 जण कोरोनामुक्त ; 6 मृत्युसह 471 जण पॉजिटिव्ह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 20 :- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 65 वर्षीय महिला आणि 42 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 85 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 65 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि घाटंजी येथील 83 वर्षीय पुरुष आहे.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 471 जणांमध्ये 327 पुरुष आणि 144 महिला आहेत. यात यवतमाळातील 242, दिग्रस 46, उमरखेड 32, दारव्हा 27, पुसद 26, बाभूळगाव 25, आर्णी 23, नेर 17, पांढरकवडा 13, रालेगाव 6, घाटंजी 5, वणी 5, महागाव 1 आणि इतर ठिकानचे 3 रुग्ण आहे.
शनिवारी एकूण 4771 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 471 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4300 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2098 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तर जिल्ह्यात एकूण 546 मृत्युची नोंद आहे.