जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण पॉझेटिव्ह ; 430 जण कोरोनामुक्त…
जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण पॉझेटिव्ह ; 430 जण कोरोनामुक्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 21 :- गत 24 तासात जिल्ह्यात 14 मृत्युसह 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 430 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 72, 79, 80, 45, 50, 58, 83 वर्षीय पुरुष आणि 63 वर्षीय महिला, पुसद येथील 85 वर्षीय महिला, महागाव येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 51 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 40 वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील 26 वर्षीय महिला आणि माहुर (जि. नांदेड) येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 382 जणांमध्ये 267 पुरुष आणि 115 महिला आहेत. यात यवतमाळातील 184, पुसद 48, दिग्रस 47, वणी 34, उमरखेड़ 17, कळंब 14, महागाव 10, दारव्हा 8, पांढरकवडा 6, नेर 4, घाटंजी 4, झरी 2, आर्णी 1, मारेगाव 1, रालेगाव 1 आणि 1 इतर शहरातील रुग्ण आहे.
रविवारी एकूण 5020 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 382 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4638 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2036 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 24593 झाली आहे. 24 तासात 430 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 21997 आहे. तर जिल्ह्यात एकूण 560 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 231968 नमुने पाठविले असून यापैकी 220600 प्राप्त तर 11368 अप्राप्त आहेत. तसेच 196007 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.