हिवरा येथे लाखोंची उलाढाल ठप्प तर अनेकांचे बुडाले रोजगार…
हिवरा येथे लाखोंची उलाढाल ठप्प तर अनेकांचे बुडाले रोजगार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा (सं) अनिल बोम्पीलवार :-
गेल्या आठ ते दहा दिवसांत हिवरा येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रथम वार्ड क्रमांक दोन हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले होते पण त्यानंतर सुद्धा गावात कोरोणा रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता संपूर्ण हिवरा गावच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले.
तालुक्यात एक मोठी बाजारपेठ म्हणून हिवरा गावाकडे बघितले जाते पण गेल्या 12 मार्चपासून कोरोणा मुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, अनेक व्यावसायिकांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोठा फटका बसला आहे. भुसार मालाचे मार्केट म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरा गावात धान्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते, यामुळे बाहेर गावच्या, शेतकर्यासह लोकांची बऱ्याच प्रमाणावर येथे ये-जा असते संपूर्ण गाव प्रतिबंधित झाल्यामुळे येथील मार्केट ठप्प झाले आहे यामुळे चहा कॅन्टीन पासून ते फळविक्रेते, हॉटेल व्यवसायिक ,पानपट्टी चालक, हमाल ,मालवाहक वाहने, यांचे व्यवसाय प्रभावित झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटा सह उदरनिर्वाह कसा करावा याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोणा ने उध्वस्त केल्यानंतर यावर्षी कसेतरी व्यवसायिकांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली होती पण पुन्हा एकदा कोरोना ने हाहाकार केला. लग्न संख्येवर आलेल्या निर्बंधांमुळे लग्नसराईच्या या हंगामात , कापड व्यावसायिक किराणा व्यावसायिक, मंडप ,बँड पथक,आचारी, प्रिंटिंग प्रेस ,फोटोग्राफर ब्युटी पार्लर यांचेसुद्धा व्यवसाय प्रभावित झाले आहे.
कोरोणा आला किंवा काही संकट आलं तरी सरकारी लोकांना त्यांचा पगार नियमित चालू असतो. पण कोणता पक्षाचा बंद असो किंवा काही आंदोलने असो याचा सर्वात प्रथम मार बसतो तो हातावर आणून पानावर खाणाऱ्या व्यावसायिकांना . कोरोणा पासून वाचणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच आमचे कुटुंब चालवणे ही महत्त्वाचे आहे, यासाठी कोरोणा नियमांचे पालन करून , आम्हाला व्यवसाय करू द्या असे येथील एका चहा कॅन्टीन व्यावसायिकाने आपली आपबिती सांगितली.