तोतया नायब तहसिलदारांचा सराफा व्यावसायिकाला गंडा ; तीन ग्रॅम सोन्याच्या दागिने घेवुन पसार ; चोरटा सीसीटीव्ही कैद
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
नायब तहसीलदार बनुन आलेली एका तोतयाने शहरातील सराफा व्यावसायिकाला गंडा घालीत तीन ग्रॅम सोन्याचे दागिने घेवुन पसार झाल्याची घटना आज महागाव शहरात घडली.
आज(दिनांक १७मार्च) दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान महागाव शहरातील सराफा लाईन मध्ये गोविंदराज ज्वेलर्स चे संचालक चंद्रशेखर लाभशेटवार हे दुकानात असतांना एक इसम दुकानात आला व आपण नायब तहसिलदार असल्याची बतावणी करून लाभशेटवार यांच्याकडे सोन्याच्या भावाची विचारणा केल्यानंतर एक ग्रामचे सोन्याचे मंगळसुत्र व दोन ग्राम कानातील फुले असे दागिने खरेदी केली त्यानंतर लाभशेटवार बिल बनवीत असतांना ग्राहक बनुन आलेला तोतया तहसीलदार दुकानातुन पसार झाला तेव्हा सदर सराफा व्यावसायिकाने दुकानाच्या बाहेर येवुन पाहणी केली असता त्याचा कुठेच मागमुसही न लागल्याने शेवटी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच सराफा व्यवसायिकाने महागाव पोलिसात तक्रार दिल्याने महागाव पोलिसांनी सराफा दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये तोतया नायब तहसिलदार कैद झाला आहे. याच तोतया नायब तहसिलदाराने शहरातील नामांकित कापड दुकानातील महागड्या साड्या घरी दाखवून आणतो म्हणुन साड्या घेवुन पोबारा केल्याची माहिती आहे .या घटनेचा तपास महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्याक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु करीत आहेत.
महागाव शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दुकान फोडीच्या व चोरीच्या घटना वाढत असतांना पोलीस प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने व पोलीस प्रशासनाच्या वतीने गस्त सुद्धा घालण्यात येत नसल्यानेचोरट्यांचे चांगलेच फावत आहे त्यामुळे आठ दिवसात जर चोरटे जेरबंद झाले नाही तर आठ दिवसानंतर महागाव शहरातील व्यापारपेठ पुर्णतः बेमुदत बंद राहील .
जगदीश नरवाडे अध्यक्ष महागाव तालुका व्यापारी महासंघ
नायब तहसीलदार असल्याची थाप मारून गोविदराज जेवलर्स मधून तीन ग्रॅम सोने पत्नीला दाखवून आणतो असे सांगून पोबारा केला काल च तहसील नायब तहसीलदार म्हणून रुजू झालो असे सांगितले पोलिसांना घटनेची माहिती होताच सीसी टीव्ही ची तपासणी केला जात आहे तहसीलदार नामदेव इसलकर याचे कडून माहिती जाणून घेनाच प्रयत्न केला असता नवीन नायब तहसीलदार रुजू झाले नसलेल्या चें सागणात आले