कोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाचा खो, खुलेआम भरतायत आठवडी बाजार….

कोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाचा खो,
खुलेआम भरतायत आठवडी बाजार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर/वाई बाजार :-
कोरोना आजाराने राज्यात पुन्हा थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर हे जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून परिस्थितीनूरूप विविध प्रकारचे आदेश निर्गमीत करीत आहेत.मात्र तालुक्यातील वाई बाजार येथे दि.९ व १६ मार्च रोज मंगळवारला पूर्वीच्याच थाटात आठवडी बाजार भरल्याने,तसेच त्यावर अंकुश लावण्यात स्थानिक प्रशासन कमी पडल्याने कोरोनाचा फैलाव अधिक तिव्रतेने होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात वाई बाजार गाव सुमारे ५२ गावाच्या केंद्रस्थानी असल्याने येथे भरणारा मंगळवारचा बाजारही फार मोठा असतो. विदर्भ,तेलंगानासह अनेक भागातील व्यापा-यांचा ओढा तिकडे असतो.भरणा-या बाजारात ना सोशल डिस्टन्सचा नियम पळाल्या जातो, ना मास्कचा, ना हॅण्डग्लोजचा वापर केल्या जातो त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होण्याची भीती वाढली आहे.परंतु त्यावर अंकुश लावण्यासाठी स्थानिक प्रशासन कुठलेही उचित पाऊल उचलण्याचा साधा प्रयत्नही करीत नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने वरीष्ठ पातळीवरून शासन-प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना व दिलेल्या आदेशाचा प्रभाव निरस्त्र होत आहे.
प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्थीची पूर्णतः पायमल्ली करून भरणा-या बाजारा बाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार,गटविकास अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायतकडे तक्रार केली असता त्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून नामानिराळे होण्याची प्रथा खोलवर रुजल्याने आपले काय होणार ? या भीतीने तालुक्यातील नागरिक हताश झाले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….