आष्टा ते पडसा ते पैनगंगा बाह्य वळण रस्ता सह रेणुका देवी – निचपूर रस्त्याला सन २०२०-२१ च्या अर्थ संकल्पात मंजूरी… नामदेवराव केशवे यांचे मागणीला पालकमंत्री चव्हाणांचा सकारात्मक प्रतिसाद…
आष्टा ते पडसा ते पैनगंगा बाह्य वळण रस्ता सह रेणुका देवी – निचपूर रस्त्याला
सन २०२०-२१ च्या अर्थ संकल्पात मंजूरी…
नामदेवराव केशवे यांचे मागणीला पालकमंत्री चव्हाणांचा सकारात्मक प्रतिसाद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर तालुक्यातील नव्यानेच राज्य मार्ग क्र.४०४ म्हणून मंजुरी मिळालेल्या आष्टा-पडसा पैनगंगा बाह्य वळण रस्ता भुसंपादनासह बांधकामासाठी २ कोटी ४० लक्ष कि.मी. ०/०० ते १/००० (रा.मा.क्र.४०४ ता.माहूर जि. नांदेड) व माहूर रेणुकादेवी-दत्तशिखर-दत्तमांजरी वझरा-मांडवा-पानोळा-वानोळा-निचपूर- राजगड या रस्त्याची सुधारणा करणे (प्र.जि.मा.-५) कि.मी.११/५०० ते १५/५०० व कि.मी. २१/००० ते २३/००० ता.माहूर जि. नांदेड या रस्त्याच्या सुधारणेसाठी ३ कोटी असा एकूण ५ कोटी ४० लक्ष रुपयाच्या निधीला महाराष्ट्र विधानसभेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्याची माहिती असून ही बाब नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी खुद नामदेवराव केशवे यांना सांगितली आहे.
सदर रस्त्यासाठी मागणी करणारे पत्र जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा कापूस पणन महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे यांनी दि. ०३ मार्च २०२१ रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना देऊन सदर रस्त्याच्या कामाची मागणी केली होती. पालकमंत्री चव्हाण यांनी सदर निवेदनाची तडकाफडकी सकारात्मक दखल घेऊन आदिवासी बहुल व दुर्गम भाग असलेल्या माहूर तालुक्याला ५ कोटी ४० लक्ष रुपयांची कामे मंजूर करून माहूर येथील भगवान दत्तप्रभू, माता अनुसया, आई रेणुका व येथील ३३ सर्व धर्मीय देवी देवतांवर आपली श्रद्धा असून तालुक्यावर आपले प्रेम तसूभरही कमी झाले नसल्याचे सिद्ध केले आहे. मागणीला मंजुरी मिळांल्याने माहूर तालुक्यातील वाई जि प. गट व वानोळा जि. प. गटातील जनतेला समान न्याय मिळाल्याने सदर मागणी केल्याबद्दल नामदेवराव केशवे यांचे व मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तडकाफडकी अर्थसंकल्पात मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे माहूर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले आहे.