राज्य मार्गा वरील वाळलेली झाडे धोकादायक…. उमरखेड – पुसद ह्या राज्य मार्गा वरील ; अपघाताची शक्यता…

राज्य मार्गा वरील वाळलेली झाडे धोकादायक….
उमरखेड – पुसद ह्या राज्य मार्गा वरील ; अपघाताची शक्यता…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोफाळी / उमरखेड :-
उमरखेड-पुसद हा राज्यमार्ग २१३म्हणुन ओळखला जातो. हे दोन्ही शहरे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या मार्गावर जास्त रहदारी चालु असते.ह्या राज्यमार्गावर अनेक वाळलेली झाडे आहे तशीच उभी आहेत.एखादे वाळलेले झाड वाहनावर पडुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वाळलेली धोकादायक झाडे संबधित विभागाने तोडुन मार्ग सुरक्षित करण्याची मागणी प्रवाशासह वाहन चालकांनी केली आहे.उमरखेड ते पुसद हा पंचेचाळीस किलोमीटरचा महत्वाचा राज्पमार्ग आहे.या राज्यमार्गावर अनेक वाहने ये-जा करतात.यामार्गावर अनेक लहान मोठी अनेक झाडे आहेत.परतु काही झाडे ही वाळलेली आहेत .पण ती तशीच उभी आहेत.एखादे वाळलेले झाड वाहनावर पडुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापुर्वी वाळलेले झाडे रस्तावर अचानकपणे कोसळल्याची अनेक उदाहरणे आहेत परतु त्यामध्ये सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही परतु वाळलेले झाड अचानकपणे एखाद्या वाहनावर कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे हि वाळलेली झाडे सार्वजनीक बाधकाम विभागाने विनाविलंब तोडुन टाकावी व मार्ग सुरक्षित करावा अशी शागणी वाहनचालकासह प्रवाशानी केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….