हिवरा ग्रा.पं. प्रशासन कुंभकर्णी झोपेत ? सचिव अनभिज्ञ ; प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची गर्दी कायम ; जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : यवतमाळ
महागाव तालुक्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या हिवरा , सेवानगर (कासारबेहळ), आनंदनगर या प्रस्तावित भागातील प्रत्येकी १ वार्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे.मात्र हिवरा येथील वार्ड क्रमांक २ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर असताना या ठिकाणी सकाळ पासून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे समोर आले.याकडे ग्रामपंचायत , पोलीस आणि पंचायत समिती प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.प्रतिबंधित क्षेत्र जाहीर असताना या क्षेत्रातील अनावश्यक दुकाने उघडी ठेवून प्रशासनाला आव्हान देण्यात आले आहे.त्यामुळे याकडे लक्ष देवून कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
हिवरा पंचायत समिती गणात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यामुळे सध्या या परिसरातील कोरोना अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५ च्या वर पोहचली आहे.
हा घ्या पुरावा :
हिवरा येथील प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या भाजिविक्रेते बैठक दुकान
त्यामुळे हिवरा येथील वार्ड क्रमांक २, आनंदनगर ३, सेवानगर येथील एक वार्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी १० मार्च रोजी आदेश परित केले आहे.मात्र या आदेशाला स्थनिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष करत कुंभकर्णी झोपचे सोंग घेतले आहे. याकडे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीला जोर आला आहे.
दंड आकारणी मोहीम पथकात लोकप्रतिनिधी यांचा समावेश कसा ? जनतेचा सवाल
मास्क न लावणे, नियम न पाळणे , यासाठी लागणारे दंड आकरणीसाठी राजकारण केल्या जात आहे. दंडास पात्र असताना
जवळील असलेल्या नागरिकांना सोडुन देण्यात येत आहे.त्यामुळे गावात आता कोरोना आड राजकारण केल्या जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
याबाबत माहिती नाही : ग्रा.पं.सचिव
याबाबत मला कुठली माहीत नाही.माझ्या घरी कार्यक्रम असल्यामुळे परवा पासून मी सुट्टीवर आहे. प्रभार कुणाकडे देण्यात आला याची सुध्धा माहिती नसल्याचे ग्रामपंचायत सचिव सावळकर यांनी पॉलिटिक्स स्पेशल प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.