पॉलिटिक्स स्पेशल बातमीचा परिणाम : तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली दखल ; हिवरा येथील ” कन्टेंन्मेन्ट झोन ” मधील दुकाने केली बंद ; सचिव व तलाठ्यांवर निलंबनाची टांगती तलवार ; तहसिलदारांची माहिती
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
विशेष प्रतिनिधी / यवतमाळ :
प्रतिबंधित क्षेत्रात सकाळपासून दुकाने सुरू असल्याची बातमी “पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह”
ने पोर्टलवर प्रकाशित करताच आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी पोलिस ताफ्यासह हिवरा येथील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या घटनास्थळी दाखल झाले.आणि प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने बंद करण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली.याबाबत संबंधित आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा तलाठी , ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव इसळकर यांनी “पॉलिटिक्स स्पेशल” ला बोलताना दिली आहे.
याबाबत सविस्तर असे की,
महागाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर ७.३४ वर पोहचला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हिवरा परिसरात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हिवरा येथील वार्ड क्रमांक २ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.मात्र सकाळ पासून या प्रतिबंधित क्षेत्रात बाजारपेठ सुरू झाली.त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ वाढली होती. पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह पोर्टल ने याबाबत बातमी प्रकाशित केली.त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेलती.पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने तात्काळ बंद करण्यात आली.मात्र याबाबत ग्रामपंचायत सचिव यांच्याशी संपर्क साधला असता येथील त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले.आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दोषी अधिकारी कर्मचारी यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.समाधानकारक उत्तर न मिळाल्यास निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव इसलकर यांनी दिली आहे.