हिवरा येथे तीन दिवसाचा जनता कर्फ्यू .
हिवरा येथे तीन दिवसाचा जनता कर्फ्यू .
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम :-
हिवरा संगम येथील करुणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने , हिवरा येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने तीन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
गेल्या आठ दिवसापासून हिवरा येथे दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आतापर्यंत आठ लोकांना यांची लागण झाली आहे आरोग्य यंत्रणेकडून अनेक लोकांची तपासणी करण्यात येत असून ह्या तपासणी मध्ये अजून, बरेच रुग्ण वाढतील अशी भीती निर्माण झाल्यामुळे हिवरा येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने तातडीची मीटिंग घेऊन कोरोना या गंभीर आजाराला आवर घालण्याच्या दृष्टीने हिवरा गाव दिनांक 12 ते 14 मार्चपर्यंत तिन दिवसाकरीता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या जनता कर्फ्यू मध्ये अत्यावश्यक सेवेतील दवाखाने व औषधी दुकाने चालू राहतील. आरोग्य यंत्रणेकडून हिवरा येथे आज पर्यंत किती लोकांच्या तपासण्या झाल्या हे समजले नसून याबाबत माहिती घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी अनेक वेळा संपर्क केला असता तालुक्या वर आलेल्या अशा गंभीर परिस्थितीतही महागाव तालुका आरोग्य अधिकारी नॉटरिचेबल आढळले.