मदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल….

मदनापुर येथे विनयभंगाची तक्रार सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर/नांदेड (राजकिरण देशमुख) :- आपण सोशल मीडियावर लिहिताना किंवा एखाद्या कार्यक्रमात बोलताना स्त्रियांचा मानसन्मान करतो . मात्र तशा घटना समाजामध्ये घडताना दिसून येत नाहीत . ज्या महाराष्ट्रामध्ये माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांनी जन्म घेतला व स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले त्याच महाराष्ट्रात स्त्रियांना अन्याय अत्याचार सहन करीत जीवन जगावे लागत आहे याचाच प्रत्यय आला तो मदनापुर तालुका माहूर येथील एका घटनेने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मदनापूर येथील एक विवाहित महिला मक्त्याने केलेल्या शेतात जात असताना पूर्वग्रहदूषित ठेवून वाईट हेतूने हात धरुन महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार (ता.7) रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली त्यानुसार संशयित आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे…
या बाबत सविस्तर वृत्त असे की,माहूर तालुक्यातील मौजे मदनापूर शिवारात मकत्याने केलेल्या शेतात विवाहित महिला एकटी जात असल्याचे पाहून संशयित आरोपी गजानन प्रकाश नेवारे रा.मदनापूर याने महिला एकटी असल्याचा फायदा घेत वाईट हेतूने हात धरून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यावरून सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधानाच्या विनयभंगाच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत मडावी हे करत आहेत.जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकाराबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान पोलिसांकडून घटनेचा योग्य दिशेने तपास करण्याची मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….