सागवान तस्कारांची महिला वनरक्षका ला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी…
सागवान तस्कारांची महिला वनरक्षका ला धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर /किनवट :- चिखली (बु) येथील सागवान तस्करांनी बोधडी वनपरिक्षेत्रातील लिंगदरीच्या जंगलात गस्त् घालत असलेल्या कु. विद्या बोर्डे या महिलावर वनरक्षकावर जिवेमारण्याची धमकी देत धक्काबुक्की करून पळून घेले आहे आपल्याला पोलीसात न्याय मिळेल की नाही या शंकेने सदर महिला कर्मचाऱ्यांनी चक्क् जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे ऑनलाईन तक्रार नोंदविले आहे. सागवान तस्कारांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून वनविभागानेही त्यांच्या बंदोबस्तासाठी पुढे सरसावले आहे.
या बाबत हाती आलेले वृत्त् असे की, बोधडी वनपरिक्षेत्रातील लिंगदरी क्षेत्रात वनरक्षक कु. विद्या बोर्डे 2 मजूरासह सायंकाळाच्या सुमारास लिंगदरीच्या जंगलात गस्त् घालीत असतांना सागवान चोरटे यांचा सुगावा लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सदर महिला वनकर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून तोडलेले सागवान जंगलात टाकून अंधाराचा फायदा घेत पळून गेले त्यांच्या समावेत कुरसंगे मनोज भिमराव, राठोड शिवराम नुरसींग हे वनमजूर असल्याने पुढील अनर्थ टळला बोधडी वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हयाची नोंद करून सदर महिला कर्मचाऱ्यांने नांदेडच्या जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली सदर महिला वनरक्षकाने सागवान चोरटयास विचारणा केली असता चिखली (बु) येथील शेख अजीज शेख नज्जू, शेख अफरोज शेख कुर्बान, शेख सद्दाम शेख अमन, शेख मजीद शेख नज्जू, शेख जाफर शेख नज्जू यांची नावे ही तक्रारीत दिली आहे. वरील आरोपींनी 17 सागवानाच्या झाडांची तोड केल्यावरून त्यांच्याविरूध्द् वन गुन्हयाची तक्रार नोंदविली आहे. या गंभीर घटनेबाबत उप वनसंरक्षक, नांदेड व जिल्हा पोलिस अधिक्षक सागवान तस्काराविरूध्द् कुठली कठोर पावले उचलतील याकडे वनप्रेमींचे लक्ष लागून आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….