मा.गडकरी साहेबानी रचला पाया मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबानी चढविला कळस केशवे साहेबांचे प्रयत्न आले फळास :- प्रा.सुजित केशवे
मा.गडकरी साहेबानी रचला पाया मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबानी चढविला कळस केशवे साहेबांचे प्रयत्न आले फळास :- प्रा.सुजित केशवे
आष्टा :- राजकीरण देशमुख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आष्टा,पडसा,राणीधानोरा पैनगंगा नदीपुल व रोडच्या कामासंदर्भात विकास पुरूष मा.ना.नितीनजी गडकरी साहेब यांची जवळपास 13 वेळेस केशवे साहेबानी प्रत्यक्ष भेट घेउन विनंती केली व माझ.गडकरी साहेबानी पक्षभेद विसरून सार्वजनीक कामास CRFफंडातून दि.29:10:2018रोजी अंतीम मंजूरी दिलीव सदरिल कामाचे लोकार्पन वभुमीपुजन दि.29:10:2018 रोजी अहमदपूर जिल्हा लातूर येथून केले. सध्या हेकाम प्रगतीपथावर असून हे गडकरी साहेबांचे उपकार मी व परिसरातील जनता कधीही विसरनार नाही.माझ्या माहूर तालूक्यातील राष्ट्रीय महामार्ग 161 अ ते आष्टा ,पडसा,पैनगंगा नदी,राणी धानोरा ते लोनबेहेळ ते राष्ट्रीय महामार्ग 361 ह्या रस्त्याचा दर्जोन्नती प्रस्ताव सा.बा.विभाग नादेंड तयार करून त्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेची ठरावाद्वारे अनुमती आवश्यक होती ती मिळाली त्यासाठी मदत करनारे पदाधिकारी व सदस्याचें अभिनंदन विदर्भातील लगतच्या यवतमाळ जिल्हा परिषदचा पन ठराव आवश्यक होता त्यासाठी केशवे साहेबानी त्याचें स्नेही क्रांती कामारकर उपाध्यक्ष जि.प.यवतमाळ याना दि.10:06:2020रोजी पत्र देऊन विनंती केली व त्याच्यां प्रयत्नानी व जि.प.यवतमाळ मधील पदाधिकारी व सदस्याच्या सहकार्याने ठराव मंजूर करन्यात आला. यानंतर आर्णि विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार संदिपभाऊ धूर्वे याना केशवे साहेबानी प्रत्यक्ष फोन करून सदरिल कामाच्या शिफारशी साठी विनंती केली.तसेच किनवट -माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम साहेबानि सूद्धा या महत्वाच्या कामाची शिफारस केली.शेवटी हा प्रस्ताव सा.बा.प्रादेशिक विभाग औरगांबाद कडून सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई कडे पाठविन्यात आला. मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबाना सदर प्रसताव मंजुरी बाबत दि.14:07:2020 रोजी श्री शंकरराव चव्हाण साहेबाच्या जयंतीदिनी नांदेड येथे पत्र देउन विनंती केली व केशवे साहेबाच्या आग्रहाखातर माननिय साहेबानी रस्तयाचे दर्जोन्नत राज्यमार्ग क्रमांक 404 म्हनून समावेश केला. असा हा या रोडच्या मंजुरी बाबतचा इतिहास आहे .म्हनुन म्हनावेसे वाटते “नितीनजीनी रचला पाया अशोकरावजीनी चढविला कळस व नामदेवराव केशवे साहेबाचे प्रयत्न आले फळास ”
असो या दोनही विभागातील ता.माहूर जि.नांदेड तह.आर्णी जि.यवतमाळ मधिल जनता मा.गडकरी साहेबाचे व मा.चव्हाण साहेबांचे उपकार व केशवे साहेबाचे प्रयत्न कधीही विसरनार नाही .सदरिल कामासाठी सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व परिसरातील ज्या ग्रामपंचायतीनी ठराव दिले त्या सरपंच व सदस्याचे तसेच सा.बा.विभाग नांदेड व यवतमाळ चे अधिकारी व कर्मचारी याचें प्रा.सुजित केशवे यानी आभार मानले .
सदर कामाच्या मंजुरीबाबत मी प्रत्यक्ष साक्षीदार असुन माझ्याकडे सर्व पुराव्यानिशी कागदपत्रे व माहीती आहे असे त्यानि आमच्या प्रतीनिधीशी बोलताना सांगीतले.