अवैध रेती तस्कराची दिग्रस तहसीलदाराला धमकी… महसूल विभागात खळबळ…

अवैध रेती तस्कराची दिग्रस तहसीलदाराला धमकी…
महसूल विभागात खळबळ…
पुरुषोत्तम कुडवे ९८२२८८७०६५
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असताना अशातच दि. ७-१२-२० रोजी दुपारी ३:१५ च्या दरम्यान आर्णी मार्गाने दिग्रस कडे रेतीचा ट्रॅक्टर येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तहसीलदार राजेश वजीरे यांना कळताच त्यांनी तलाठी सोबत घेऊन देववाडी पुनर्वसन गावाजवळ आर्णी बायपास जवळ बिना नंबरचे रेती ट्रॅक्टर अडवून या बाबत विचारपूस करतातच सदर आरोपी ने हमारा ट्रॅक्टर कैसे पकडते असे बोलून धमकी दिल्यावरून आरोपीविरुद्ध दिग्रस पोलिस स्टेशन ला ३७९,१८६,१८९,१८८, ५०६,३४ भादवी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. सविस्तर वृत्त असे की, गोपनीय माहिती मिळाल्यावरून तहसीलदार राजेश वझीरे हे तलाठी इंगोले ,ढोले व कोतवाल अक्षय बेलखेडे यांच्यासह सदर अवैध रेती वाहतूकी वर कारवाई करण्यासाठी निघाले असता बायपास च्या समोर इदगाह जवळ एक बिना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना दिसून आला. सदर ट्रॅक्टर चालकास थांबविण्यास सांगितले असता तो थांबला मात्र त्याने नाव व पत्ता देण्यास नकार दिला पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे चाबी मागितली असता त्यांनी काढून दिली.व पोलीस निरीक्षकास सदर घटनेची फोन द्वारे माहिती दिली. त्यानंतर पंचनामा करीत असताना ट्रॅक्टरचा मालक मोहम्मद मतीन अब्दुल मोबीन व त्यांचा मुलगा लकी तेथे आला. धमकी देऊन ट्रॅक्टर डायरेक्ट सुरू करून घेऊन गेला. व एक ब्रास रेती चोरटी वाहतूक करून ट्रॅक्टर पळून नेला अश्या आशयाचे तक्रारीवरून सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.



सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….