विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुसद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद…


विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला पुसद मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :-
येथे देशातील विविध शेतकरी संघटनांनी भाजप सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा, आदी शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला होता. या भारत बंदला पुसदमध्ये विविध राजकीय पक्षांनी समर्थन दिले तसेच सहभाग घेतला. यावेळी पुसदमध्ये छत्रपती चौक मधून सकाळी साडेदहा वाजता पुसद बंदचे आव्हान करण्यासाठी फार मोठी रॅली निघाली. विविध शेतकरी संघटनेचे नेते व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावेळी संबोधित केले. व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने काही प्रमाणात उघडली होती परंतु रॅली नंतर बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली. त्यामुळे पुसद बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व पुसद बंद यशस्वी झाला. या रॅलीत बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारतीय विद्यार्थी, युवा बेरोजगार मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा, संभाजी ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, उपेक्षित दलित सामाजिक परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बिरसा मुंडा ब्रिगेड, आदी विविध सामाजिक संघटना तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, एम. आय. एम. आय. एम,आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर रॅलीत विविध शेतकरी संघटनांचे बॅनर व झेंडे मोठ्या प्रमाणात होते. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता. यावेळी सर्व संघटनांनी तीन शेतकरी विरोधी काळे कायदे वापस घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांच्या वतीने महामहीम राष्ट्रपती भारत यांना निवेदन देण्यात आले. तीन शेतकरी विरोधी काळे कायदे वापस न घेतल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला. यावेळी डॉक्टर मोहम्मद नदीम, सुधीर भाऊ देशमुख, बाळासाहेब कामारकर, गणपतराव गव्हाळे, लक्ष्मण कांबळे, उमाकांत पापिनवार, राजू दुधे, शेख कयूम, सय्यद सिद्दिकोदिन, राजेश ढोले, हाजी रियासत अली, किशोर कांबळे, विश्वजीत लांडगे, सुभाष धुळेधुळे,राजेश ढोले, भोलानाथ कांबळे, देवेंद्र खडसे, राजेश काळे, आकाश गडधने, अजय गडम, पुंडलिक शिंदे,नामदेव इंगळे, पांडुरंग व्यवहारे, जकी अन्वर, अशोक बाबा उंटवाल, मारुती भस्मे, विजय पवार, मजीद लाला, राहुल कांबळे आदी विविध शेतकरी संघटना,सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे नेते हजर होते.



सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….