किसान आंदोलन समर्थनार्थ साखरा मध्ये शेतकरी पुत्रांचा रास्तारोको आंदोलन विविध मागण्या त्वरीत मान्य करण्याची मागणी…

किसान आंदोलन समर्थनार्थ साखरा मध्ये शेतकरी पुत्रांचा रास्ता रोको आंदोलन…
विविध मागण्या त्वरीत मान्य करण्याची मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :-
तालुक्यातील साखरा गावी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तब्बल एक ते दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.वसंत प्रतिष्ठान या संघटनेच्या पुढाकाराने सोमवारी दि.७ ला स.९ वाजता गावातील शेकडो शेतकरी पुत्रांनी दारव्हा-दिग्रस महामार्ग रोखून धरले दरम्यान जय जवान जय किसान,वंदे मातरम्, इंकलाब झिंदाबादचे नाऱ्यांनी परिसर दणाणून गेला.
मोदी सरकारनी शेतकरी विरोधी कायदे त्वरीत रद्द करावे आणि MSPची गैरंटी द्यावी आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावे अशा विविध मागण्या त्वरीत मान्य करावे आणि दिल्ली येथील आंदोलकांशी त्वरीत चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करावे. किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी जर मोदीसरकरनी कायद्याबाबत त्वरीत मार्ग काढला नाही तर पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा वसंत प्रतिष्ठानचे विशाल चव्हाण, सुभाष चव्हाण,पवन आडे, मिथुन राठोड, मनोज चव्हाण, अभय येरावार, राठोड, नितु नाईक, अमोल राठोड, मनोज जैस्वाल, गोपाल, संदिप चव्हाण, राजेश आडे, सचिन, मास, सुमित, कुंडलिक, नयन, रामेश्र्वर, चिंपु, निलेश आडे, तुका, योगेश, विकी,अमित, सुजित, मयुर, अनंत यासह शेकडो शेतकरी पुत्र उपस्थित होते.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”