उपकोषागार अधिकारी सहकारी वनरक्षकास सापळ्यात अटक ! यवतमाळ एल सी बी पथकाकडुन कार्यवाई
उपकोषागार अधिकारी सहकारी वनरक्षकास सापळ्यात अटक !
यवतमाळ एल सी बी पथकाकडुन कार्यवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :-
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य बिटरगाव वनपरिक्षेत्राधिकारी (वन्यजीव) कार्यालयातील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी अरुण गोरे यांचा मागील पाच महिण्याचा रखडलेला पगार काढण्यासाठी सहा हजार रुपये लाच मागल्या ची घटना लाचलुचपत विभागाने उघडकीस आणली आहे.
त्रस्त झालेल्या सेवा निवृत गोरे यांनी यवतमाळ येथिल लाच लुचपत विभागात रितसर तक्रार नोंदविली त्यानंतर येथील पथकांने दि. २६ ऑक्टोंबर रोजी सापळा रचुन धाड टाकली असता , उप कोषागार कार्यालय उमरखेड येथे फिर्यादि वन खात्या तिल सेवा निवृत अधिकारी अरुण गोरे यांच्या कडुन उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य बिटरगाव वनपरिक्षेत्र (वन्यजीव) कार्यालयात कार्यरत वनरक्षक गोविंद फुलोरे व सहकारी उप कोषागार अधिकारी अंबादास मेसरे यांनी सहा हजार रुपये स्वीकारले असता या दोन्ही आरोपीला यवतमाळ लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले , आता अधिकाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी त्याच कार्यालयातील कर्मचारी लाचेची मागणी करतात हा प्रकार मात्र वेगळा दिसत आहे
बिटरगाव वनपरिक्षेत्रात बऱ्याच गोष्टीला ला द्यावे लागत असते ही बाब सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी अरुण गोरे यांनी उजेडात आणली आहे .
आरोपी उप कोषागार अधिकारी अंबादास मेसरे व वनरक्षक गोविंद फुलोरे यांना अटक करण्यात आली हि कार्यवाई लाच लुचपत्त विभागाचे पथक अधिकारी यांनी केली आहे