‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 38 जणांना सुट्टी 27 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 38 जणांना सुट्टी
27 जण नव्याने पॉझेटिव्ह ; एकाचा मृत्यु
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 14 :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 27 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 526 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9175 झाली आहे. बुधवारी 38 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8271 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 291 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 82106 नमुने पाठविले असून यापैकी 81395 प्राप्त तर 711 अप्राप्त आहेत. तसेच 72220 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….