पैनगंगा नदी पात्रात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला सहस्रकुंड धबधब्याची घटना
पैनगंगा नदी पात्रात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला
सहस्रकुंड धबधब्याची घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात सेल्फी घेत असताना ममता संतोष कुमार ही महिला अचानक नदीपात्रात पाणी आल्याने वाहून गेल्याची घटना दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता घडली होती त्या महिलेचा मृतदेह आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता पैनगंगा नदी पात्रात सापडला आहे
यवतमाळ शहरातील पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत कर्मचारी संतोष कुमार व त्यांचा परिवार पर्यटन स्थळ बघण्यासाठी सहस्रकुंड धबधबा परिसरात आले असता नदीपात्रात सेल्फी घेत असताना मुरली बंधाऱ्याचे गेट अचानक सोडले असता पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखरूप बचावली पण ममता संतोष कुमार ही महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी घडली
त्या महिलेचा शोध बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण करत असताना नदीपात्राचा पूर्ण परिसर पाहानी केला असता आज दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता त्या महिलेचा मृतदेह सहस्रकुंड धबधबा पासून 5 किमी अंतरावर पैनगंगा नदी पात्रात सापडला आहे तो मृतदेह ममता कुमारचा असल्याची ओळख पती संतोष कुमार यांना पटली आहे महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला आहे
सदर मृत्यूची नोंद बिटरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस ठाणेदार विजय चव्हाण व त्यांचे सहकारी करत आहे