रस्ता अडवून बेदम मारहाण करून युवकांनी केली लूटमार
अवघ्या काही तासात पोलिसांनी लावला आरोपीचा शोध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे मो-9822887065
दिग्रस:
तालुक्यातील फुलवाडी येथील दरोडेखोरांनी एका दुचाकी वरील तिघास अडवून बेदम मारहाण करित त्यांचे जवळील ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान सवनग खुर्द शिवारात घडली. या घटनेबाबत दिग्रस पोलिसांत तक्रार दाखल होताच अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा तपास करित पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी शेख सादिक शेख रज्जाक रा.आर्णी यांचे सासरे अब्दुल सलीम अब्दुल कदिर रा.आसेगाव ता.मंगरूळपीर दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी जावईला फोन आला होता की, मी दिग्रस ला उतरणार आहे. ” तेव्हा तुम्ही मला घेण्यासाठी दिग्रसला या ” तेव्हा फिर्यादी हा आपल्या दुचाकी क्र. एम.एच.३० झेड.९५५७ ने आपला मावस भाऊ फैजान शेख याला घेऊन दिग्रसला आले.
तेव्हा दिग्रसवरून परत आर्णीकडे तिघे जण आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२९ एस.८४७० ने जात असतांना चिरकुटा जवळ दोन इसमांना यवतमाळ जाण्याचा रस्ता विचारला असता आमच्या मागे या असे फिर्यादीने सांगितले. तेव्हा काही अंतरावरील सावनगा खुर्द पुलाजवळ रात्री ९.३० वाजता दुचाकी अडवी केली व तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लगेच समोरून एका दुचाकी वाहनवरून तीन जण असे एकूण पाच जणांनी या तिघांवर हल्ला चढविला. व त्यांच्या जवळील असलेले अंदाजे ओपो कंपनीचा मोबाईल ५ हजार रुपये, जिओ मोबाईल १ हजार २०० रुपये व जवळील नगदी रुपये ११०० रुपये जबरीने मारहाण करून हिसकावून घेतले. कसाबसा जीव वाचवून त्यांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठले. तेव्हा तात्काळ पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले,हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव, दिपक ढगे,चेतन चव्हाण, सचिन राऊत, ब्रम्हानंद टाले यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. दरोडेखोरांच्या वाहन क्रमांकावरून आरोपीचा शोध सुरू केला. त्यात आरोपी योगेश भीमराव राठोड (वय -२५ वर्षे) रा.फुलवाडी ता.दिग्रस याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आरोपी प्रवीण रमेश जाधव (वय-२२), रामेश्वर राजुसिंग राठोड(वय-२७), अरविंद रमेश जाधव(वय-२१) व अनिकेत दिलीप जाधव(वय-२१) सर्व रा.फुलवाडी येथील साथीदारांचे नाव सांगितले.
त्यावरून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेणे सुरू आहे. आरोपीकडून त्याच्या बाबतची कसून चौकशी सुरू असून अजून याआधी किती प्रकार झाले याबाबतचा खुलासा पोलिसांकडून सुरू आहे. आणखी असे कृत्य केल्याचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी उदयसिंह चंदेल हे लगेच घटना स्थळी येऊन फिर्यादी कडून सविसतर घटना जाणून घेऊन आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यावरून पोलीस निरीक्षक
सोनाजी आम्ले यानी आरोपीविरुद्ध दरोडा घातल्या प्रकरणी भादवी कलम ३९५ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….