पैनगंगा नदी पात्रात आढळला अनोळखी मृतदेह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील सहस्रकुंड पैनगंगा नदी पात्रात आज सकाळी सात वाजता अनोळखी मृतदेह नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे
मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदी पत्रावर आहे मराठवाड्यातील परोटी ग्रामस्थांनी नदीपात्रात मृतदेह वाहत असल्याची माहिती मुरली येथील पोलीस पाटील मिथुन राठोड यांना दिल्यानंतर बिटरगाव पोलीस ठाणेदार व कर्मचाऱ्यांसह काल संध्याकाळी 6 वाजता पासून रात्रभर या मृतदेहाचा शोध घेणे चालू होते तो मृतदेह आज सकाळी सात वाजता सहस्रकुंड धबधबा पासून तीन किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात मृतदेह सापडला आहे

बिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार सदर मृतदेह वय अंदाजे 35 ते 40 वर्ष आहे अंगामध्ये आकाशी रंगाचा टीशर्ट व फिकट कथीया रंगाचा नाईट पॅन्ट आहे उजव्या हाताला लाल धागा बांधलेला आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मर्ग नोंद करण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला आहे पुढील तपास बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये, नरेंद्र खामकर, अतिश जारंडे, रवी गीते, गजानन खरात, संदीप राठोड, सतीश चव्हाण व भालेराव करत आहे

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….