24 तासात 296 जणांची कोरोनावर मात,तिघांचा मृत्यु,95 नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 27 :
वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 296 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 95 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील 58 वर्षीय व घाटंजी शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 95 जणांमध्ये 69 पुरुष व 26 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 30 पुरुष व 16 महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब शहरातील पाच पुरुष व एक महिला, महागाव शहरातील चार पुरुष, महागाव तालुक्यातील सात पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व एक महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील एक महिला, वणी शहरातील आठ पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, झरीजामणी शहरातील एक पुरुषाचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 559 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 543 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8190 झाली आहे. यापैकी 6838 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या 250 झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 275 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 72766 नमुने पाठविले असून यापैकी 71702 प्राप्त तर 1064 अप्राप्त आहेत. तसेच 63512 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..