‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “1990 च्या दशकात एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलेलं. ते गाण होतं, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाण 90 च्या दशकात अनेकांच्या ओठांवर होतं.
त्यावेळच्या तरुण पिढीने हा गाणं डोक्यावर घेतलं होतं. प्रियकर-प्रेयसीच्या भावनांवर हे गाणं होतं. या गाण्याची त्या काळात प्रचंड क्रेझ होती. या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचं आज निधन झालं आहे. ते नागपुरात वास्तव्याला होते. जहीर आलम नागपूरच्या मोमीनपुरा या वस्तीतील एका छोट्याशा घरात वास्तव्यास होते. त्यांचे जीवन संघर्षात आणि आर्थिक विवंचनेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरकारांच्या विस्मरणात गेले होते.
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ हे गीत सुरुवातीला स्थानिक स्तरावर गायले जात होते. त्यानंतर त्याला अल्ताफ राजा यांनी गायल्यानंतर हे गीत अजरामर झाले. त्यांच्या या सदाबहार गाण्याने अनेकांचा फायदा झाला. मात्र,त्यांची झोळी रिकामीच राहिली.
पण तसं घडलं नाही
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’ या गाण्यावर अल्बम काढणाऱ्या कंपनीने, गायकाने भरपूर पैसा कमावला. पण या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांच्या वाट्याला मात्र कष्टच आले. खरंतर या गाण्याने त्यांच्या आयुष्यातील आर्थिक विंवचना संपायला हव्या होत्या. पण तसं घडलं नाही. हे गीत त्यांनी बनवलं. पण त्यांच्या वाट्याला उपेक्षा, कष्ट आले. ते एम्प्रेस मिलमध्ये नोकरीला होते. पण ही मिल नंतर बंद पडली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील कष्टप्रद प्रवास सुरु झाला.
कव्वाली म्हणून हे गाणं गायलं जायचं
आधी कव्वाली म्हणून हे गाणं गायलं जायचं. पण अल्ताफ राजा यांनी म्युझिक अल्बममध्ये हे गाणं गायल्यानंतर रातोरात हिट झालं. चहाची टपरी, रिक्षा इथे गे गाणं वाजू लागलं. गीतकार म्हणून त्यांना मात्र अल्प मानधन मिळालं.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….