खसादार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे येत्या 16 मे पासून महाराष्ट्रातील 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दोन महिन्यांचा दौरा असणार आहे.
तर 15 जुलै रोजी त्यांचा हा दौरा संपणार आहे. या दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे थेट कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत. तसेच SIR मोहिमेअंतर्गत शिवसेना BLA 1\ BLA 2 यांच्या नेमणुकांचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे.
पहिल्या टप्यात नाशिक, धुळे, आहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोल्याचा दौरा होणार
तीन टप्यात हा दौरा होणार असून पहिल्या टप्यात नाशिक, धुळे, आहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला हा दौरा असणार आहे. दुसऱ्या टप्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली सा दौरा असणार आहे. तर तिसऱ्या टप्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा हा दौरा असणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन बांधण्यासाठी हा दौरा महत्वाचा
30 मार्च रोजी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात दौरा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 65 ते 70 ठिकाणी दौरे केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 22 जिल्ह्यात असलेल्या 11 मंत्र्यांना संपर्क प्रमुख म्हणून दोन जिल्हे दिले आहेत. ताकद वाढवण्याचं काम केल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. आता श्रीकांत शिंदे यांचा 22 जिल्ह्याचा दौरा 16 मे ते 15 जुलै दरम्यान करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन बांधण्यासाठी हा दौरा होणार आहे. यापूर्वी ज्या लोकांना पद दिली त्याचं कामच मूल्यमापन केलं जाईल. उत्तर महाराष्ट्रातून हा दौरा सुरू होणार असल्याची माहिती सचिन चौधरी यांनी दिली. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद देण्याचं काम करण्यात येणार आहे. हा दौरा संघटनेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात
राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….