तामिळनाडूत अखेर ‘विजय’ सरकार..! ; कसे जुळले सत्तेचे गणित….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडूमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच अखेर शनिवारी सुटला. तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला ‘द्रमुक’चे मित्रपक्ष असलेल्या व्हीसीके आणि आययूएमएल यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे थलपथी विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
विजय आज, रविवारी सकाळी १० वाजता तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी त्यांना १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यपालांकडून नियुक्तीचे पत्र; १२१ आमदारांचे बळ
२३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता असताना, जोसेफ विजय यांनी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांना सुपूर्द केले. गेल्या चार दिवसांत राज्यपालांची ही चौथी भेट होती. पाठिंब्याची खातरजमा झाल्यानंतर राज्यपालांनी विजय यांची तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य सोहळा
मुख्यमंत्रीपदाचा हा दिमाखदार शपथविधी सोहळा चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तेचे समीकरण जुळल्यानंतर आता सर्वांचे लक्ष १३ मे रोजी होणाऱ्या ‘फ्लोर टेस्ट’कडे लागले आहे.
असे जुळले सत्तेचे गणित
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राजकीय अनिश्चितता निर्माण झाली होती. १०८ जागांसह ‘टीव्हीके’ हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, मात्र बहुमतासाठी १० आमदारांची कमतरता होती.

पंतप्रधानांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद! एकनाथ शिंदे आता वापरणार इलेक्ट्रिक कार; ताफ्यातही केली कपात
राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….