हिवरा येथील कोरोणा रुग्णांचा आकडा गेला पाच वर…
अनिल बोम्पीलवार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा
गेल्या चार सप्टेंबरला हिवरा येथे कोरोणाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने हिवरा येथील एकवीरा नगर मधील काही भाग प्रतिबंधित केला होता.व या परिसरातील तीस ते पस्तीस नागरिकांचे स्वेब घेऊन कोरोणा चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. काल दिनांक 11 सप्टेंबरला यातील चार व्यक्तींचे कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे हिवरा येथील कोरोणा रुग्णांची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर ढिल मिळत असल्याने नागरिकाकडून सरकारी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही संख्या किती उग्ररूप धारण करते हे काही सांगता येत नाही काल यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोरोणा रुग्णांच्या मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता लोकांनीसुद्धा अधिकाधिक सतर्क राहून स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेणे व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे झाले आहे.
हिवरा येथील एकवीरा नगर मधील प्रतिबंधित केलेले क्षेत्र