खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा अपघात, भरधाव वाहनाची धडक ; गुजरात पासिंगचं वाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान भीषण अपघात झाला. आज महामार्गावरून जात असताना एक वाहनचालक बेदरकार वाहन चालवत असल्याने त्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली.
सुदैवाने यात काही दुर्दैवी घडलेलं नाहीय.
सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती
याबाबत सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुळे यांनी संबंधित गाडी चालकाचा नंबर देखील शेअर केला आहे. ‘जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित बचावले. सीट बेल्ट घातल्यामुळे मी बचावले असल्याचं’, सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
रस्ते सुरक्षित करण्याचे आवाहन
या घटनेनंतर महामार्गावरील वाढत्या बेफिकीर वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त होत आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. नागरिकांनी सीट बेल्टचा वापर करावा, सतर्क राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवून रस्ते सुरक्षित करण्याचं आवाहन सुप्रिया सुळेंकडून करण्यात आलं आहे.
‘लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांच्याकडून शाईफेक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आपणास ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचं लवांडे यांनी सांगितलं. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणात, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना आणि सरकारला इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरही पोस्ट केली आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….