खळबळजनक दावा..! ” भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या व्हिडिओमुळे राज्यात वादळी चर्चा झाली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सरकारने याचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली. हा तपास सुरू असतानाच पटोले यांनी राज्यातील ४ मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल असं आम्ही आधीपासून सांगतोय, विधानसभेतही आम्ही बोललो. या खरात प्रकरणात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे. याबाबत पत्रसुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे राजकीय गुंड असतील किंवा भोंदू बाबा असतील हे समोर येत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सगळे घडतंय. राज्यात भीती नावाचा प्रकार संपला आहे त्यामुळे अशा घटना यापुढेही महाराष्ट्रात सुरू राहतील असा आरोप करत नाना पटोले यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेवरून सरकारला धारेवर धरले.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणात अडकलेले ४ मंत्री कोण अशी चर्चा नाना पटोले यांच्या दाव्यानंतर सुरू झाली आहे. नाशिकच्या खरात याने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचं सांगत अनेक महिलांवर अत्याचार केले. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही महिलांनी पुढे येत खरातचे काळे कारनामे जगासमोर आणले. त्यानंतर खरात प्रकरणात अनेक व्यावसायिकही त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत पुढे आले. विशेष म्हणजे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या रुपाली चाकणकर यांचेही नाव यात जोडले गेले. विरोधकांच्या दबावानंतर चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….