शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्र 1 नंबरवर, एमसीआरबी’चा धक्कायादक अहवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात सरासरी दर पाचव्या मिनिटाला एका व्यक्तीचा हत्या, आत्महत्याकिंवा अपघाती मृत्यू घडतो, असे निरीक्षण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने एमसीआरबी जारी केलेल्या अहवालात मांडले आहे. राज्यात ३६ हजार रस्ते, रेल्वे अपघातात १९४७५ मृत्यू झाले.
मात्र प्रकृती खालावून झालेल्या अपघातांची संख्या २५ हजारांवर आहे. त्यात १५ हजार मृत्यूध्यानीमनी नसताना आलेल्या हृदयविकाराने घडल्याचे ब्युरोच्या. अहवालात नमूद आहे.
हत्या, आत्महत्या वगळता हीमस्खलन, पूर, सुनामी, चक्रीवादळे, भुकंप, थंडीचा कडाका, उष्माघात, अतिवृष्टी, वणवा, कोव्हिड सारखे साथीचे आजार आदी नैसर्गिक आपत्ती आणि विमान, जहाजे, रेल्वे, वाहनांचे अपघात, इमारत कोसळून, आगीत होरपळून, धडपडून, बुडून, वीज पडून, अचानक हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या नैसर्गिक आणि अन्य कारणांमुळे २०२४ मध्ये देशात एकूण ४.६७ लाख नागरिकांचा अपघाती, अकस्मात मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रात ७५८०७ मृत्यूंची नोंद झाली.
ती एकूण संख्येच्या १६ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे २०२३च्या तुलनेत अपघाती, आकस्मिक मृत्यूंची संख्या सहा हजारांनी वाढली. देश पातळीवर सरासरी दर लाख लोकसंख्यामागे ३३ मृत्यू हे प्रमाण नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात मात्र ते ५९ इतके भरले. आकस्मिक मृत्यूंसोबत विविध कारणांमुळे २२१७४ व्यक्तींनी आत्महत्या केली. तर २२११ जणांची हत्या केली गेली. या तिन्ही प्रकारात घडलेली मनुष्यहानी एक लाखापुढे गेली. चालता बोलता उघडे गटार, मेनहोल, खड्ड्यात, तलावात, नदीपात्रात पडून बुडून आणि धडपडल्याने गंगीर जखमी होत, तोल जाऊन उंचावरून पडून १० हजारांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू महाराष्ट्रात झाला.
सर्वाधिक विमान, बोटींचे अपघात महाराष्ट्रात नोंद झाले. आगीच्या सर्वाधिक घटनाही राज्यात नोंद झाल्या. अपघाती मृत्यू म्हटल्यास रस्ता, रेल्वे रुळ ओलांडताना, प्रवास करताना घडणारे अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यहानी प्रतीत होते. मात्र त्यात अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटका किंवा अचानक तब्येत खालावल्याने झालेला मृत्यूही अपघाती म्हणून गणला जातो.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….