निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छ. संभाजीनगर :- “नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. महापालिका प्रशासनाने बुधवारी पहाटे ६:१५ वाजता नारेगाव परिसरातील पटेल यांच्या तीन अनधिकृत मालमत्तांवर बुलडोजर चालवला.
या कारवाईमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.
मध्यरात्रीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
महापालिका कारवाई करणार असल्याचा सुगावा लागताच, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे आपल्या ३४ नगरसेवकांसह आणि हजारो कार्यकर्त्यांसह मध्यरात्री साडेबारा वाजता नारेगावमध्ये दाखल झाले. “ही कारवाई पूर्णपणे राजकीय सुडबुद्धीने सुरू आहे,” असा आरोप करत आंदोलकांनी पहाटेपर्यंत तिथेच ठाण मांडले होते. कोणत्याही परिस्थितीत मालमत्तेला हात लावू देणार नाही, अशी भूमिका एमआयएमने घेतली होती.
प्रशासनाचा वज्रनिर्धार
नगरसेवक मतीन पटेल यांनी महापालिकेच्या नोटिशीला कोणतेही कायदेशीर उत्तर दिले नव्हते, तसेच त्यांनी खंडपीठात धाव घेतली असता त्यांना तेथूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात करत पहाटेच्या सुमारास तीन जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. विरोधाची धार तीव्र असतानाही प्रशासनाने आपले काम पूर्ण केले.

२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….
“राज्यात गुंडाराज सुरू..!” मतीन पटेल मालमत्ता कारवाईवर इम्तियाज जलीलांचा प्रशासनावर प्रहार….
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’