‘थलपती’ बनला मुख्यमंत्री..! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते, चाहते उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हेही या शपथविधी सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिले.
विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी १० मे रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर ही वेळ बदलून १० वाजताची करण्यात आली. या नियोजित वेळेनुसार विजय यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
विजय यांच्यासोबत कुणी कुणी घेतली शपथ
आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबतच थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए. सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….