थलपती विजय यांच्यासोबत मोठा ‘गेम’! शपथविधीवर पुन्हा ग्रहण; बहुमताचं गणित कसं बिघडलं..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडूचं राजकारण सध्या एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखं वळणं घेत आहे. सुपरस्टार आणि टीव्हीके प्रमुख थलपती विजय हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनणार, अशा चर्चा रंगल्या असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा मोठा ट्विस्ट आला.
ज्या बहुमताच्या आकड्यांच्या जोरावर विजय सरकार स्थापन करण्याचा दावा करत होते, त्याच आकड्यांनी आता थलपतींना हुलकावणी दिली. परिणामी, शनिवारी होणारा संभाव्य शपथविधी आता लटकला असून, विजय यांच्या राजकीय प्रवासात मोठा पेच निर्माण झाला आहे.
बहुमताचा आकडा अन् सत्तेची सापशिडी
तामिळनाडूत सरकार स्थापन करण्यासाठी ११८ या जादूई आकड्याची गरज आहे. थलपती विजय यांनी दोन जागांवरून विजय मिळवला आहे, त्यामुळे नियमानुसार त्यांना एक जागा सोडावी लागेल. अशा स्थितीत त्यांच्या पक्षाकडे सध्या १०७ जागा आहेत. विजयासाठी त्यांना आणखी ११ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
सुरुवातीला काँग्रेस (५ आमदार), सीपीआय (२) आणि सीपीआय-एम (२) यांनी विजय यांना पाठिंबा दिल्याने हा आकडा ११६ पर्यंत पोहोचला होता. मात्र, उरलेल्या दोन जागांसाठी सुरू असलेला संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये. थलपती विजय यांच्या सत्तेच्या स्वप्नाला खरा सुरुंग लावला तो आययूएमएल आणि व्हीसीके या दोन पक्षांनी. आययूएमएलने सुरुवातीला पाठिंब्याचे संकेत दिले होते, पण शुक्रवारी रात्री त्यांनी स्पष्ट केलं की ते डीएमके सोबतच राहतील. “आम्ही आधीही डीएमकेसोबत होतो आणि आताही राहू,” असं म्हणत त्यांनी विजय यांना पाठिंबा देण्यास नकार दिला.
राज्यपालांचा वेट अँड वॉच पवित्रा
थलपती विजय यांनी आतापर्यंत तीन वेळा राज्यपाल आर.एन. रवी यांची भेट घेतली आहे. मात्र, जोपर्यंत ११७ किंवा ११८ आमदारांच्या समर्थनाची पत्रं अधिकृतपणे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत राज्यपालांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यास नकार दिला आहे. विजय यांनी बहुमताचा दावा तर केला, पण कागदोपत्री आकडा न जुळल्याने राज्यपालांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, व्हीसीके पक्षाने पाठिंबा देण्यासाठी सत्तेत वाटा मिळवण्याची अट घातली आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर थेट सत्तेत भागीदारी मागितल्याने विजय यांची कोंडी झाली आहे.
सस्पेंस वाढला
शनिवारी विजय यांचा शपथविधी होईल या आशेने हजारो कार्यकर्ते चेन्नईत जमा झाले होते. राजभवन परिसरातही कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. पण रात्री झालेल्या राजकीय घडामोडींनंतर कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत थलपतींचा ‘विजय’ केवळ कागदावरच राहणार आहे.
पुढचं गणित काय?
आता थलपती विजय यांना पुन्हा एकदा लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. डीएमके आणि एआयडीएमके सुद्धा या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तामिळनाडूच्या या राजकीय रणधुमाळीत आता थलपती विजय बहुमताचं हे कठीण गणित कसं सोडवतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सुवेंदू अधिकारींनी घेतली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ….
भाजपा आमचा पहिला शत्रू’, सुवेंदू अधिकारींच्या शपथविधीनंतर ममता बॅनर्जींची टीका; विरोधी ऐक्याची हाक….
गोकुळच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना धुलाई यंत्रात टाकून स्वच्छ करू नये – सुप्रिया सुळे….
महाराष्ट्र, पश्चिम बंगालनंतर आता पंजाब निशाण्यावर”, आपच्या मंत्र्याला १०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून अटक; संतप्त प्रतिक्रिया समोर….
रवींद्रनाथ टागोरांच्या पत्राच्या आडून ओवेसी यांनी केला ‘वंदे मातरम’ ला विरोध….
थलपती विजय यांच्यासोबत मोठा ‘गेम’! शपथविधीवर पुन्हा ग्रहण; बहुमताचं गणित कसं बिघडलं..?