पश्चिम बंगाल असो की आसाम, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची नाचक्की ; फक्त ‘या’ राज्याने राखली अब्रू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षासाठी म्हणजेच काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहेत. ज्या पाच राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा झाला, त्यापैकी चार राज्यांत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, हे वास्तव चकित करणारे आहे.
केरळ वगळता इतर सर्वत्र काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला आहे. यामुळे पक्षाच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची अवस्था आज दयनीय झाली आहे. ममता बॅनर्जींचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपने मुसंडी मारली असताना काँग्रेस मात्र पूर्णपणे बाहेर फेकली गेली आहे. डाव्यांशी केलेली युती असो किंवा प्रचारतंत्र, मतदारांनी काँग्रेसला सपशेल नाकारले आहे. येथील लढाई आता केवळ तृणमूल विरुद्ध भाजप अशीच मर्यादित राहिली असून, काँग्रेसचा पत्ता कट झाला आहे.
काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व कमी पडले
आसाममध्येही हीच स्थिती असून भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाच्या आणि विकासकामांच्या अजेंड्याला प्रत्युत्तर देण्यास काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व कमी पडले. कार्यकर्त्यांमधील उत्साह संपला असून संघटनात्मक बांधणी केवळ कागदावरच उरल्याचे निकालांवरून स्पष्ट होते.
केरळने पक्षाची अब्रू वाचवली
संपूर्ण देशात काँग्रेसची पीछेहाट होत असताना केरळने मात्र पक्षाची अब्रू वाचवली आहे. केरळमधील मतदारांनी काँग्रेसवर दाखवलेला विश्वास हा पक्षासाठी संजीवनी ठरू शकतो. येथे काँग्रेसने जोरदार पुनरागमन करत सत्ताधारी डाव्या आघाड्यांना कडवी झुंज दिली आहे. मात्र, केवळ एका राज्याच्या विजयावर समाधान मानणे काँग्रेससाठी आत्मचिंतनाचा विषय आहे.
काँग्रेसच्या पराभवाचे नेमकं कारण काय?
या निकालांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर काही प्रश्न निर्माण केले आहेत. प्रादेशिक पातळीवर सक्षम नेत्यांचा अभाव, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि विस्कळीत प्रचार यंत्रणा ही काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत. भाजपची शिस्तबद्ध निवडणूक यंत्रणा आणि प्रत्येक राज्यात असलेला ‘चेहरा’ याला तोड देण्यास काँग्रेस अपयशी ठरत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….